अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंरबला पणजी येथे सत्कार
पणजी – मूळचे सरगवे, दोडामार्ग येथील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय भारतीय सैनिक सुभेदार अजय अनंत सावंत यांचा सन्मान सोहळा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सैन्यदलात राष्ट्रसेवा करत असतांनाही त्यांनी अवघड समजल्या जाणार्या ‘टेन्ट पेगिंग’ या घोडेस्वारीच्या खेळात स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली होती. सुभेदार सावंत यांनी आतापर्यंत देशविदेशात मिळून एकूण १५६ पदके या खेळात मिळवली आहेत. सैन्यदलानेही ६ पदके देऊन सुभेदार सावंत यांचा सन्मान केला आहे. अशा या तडफदार खेळाडू सैनिकाचा सन्मान सोहळा महालसा सभागृह, तिसरा मजला, सिद्धार्थ भवन, पणजी येथे होणार आहे.