सत्तेवर आल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला विनामूल्य पाणी आणि वीज पुरवणार ! – मगोप
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मगोप सत्तेवर आल्यास राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणा मगोपचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी केली. माजी मंत्री श्री. दीपक ढवळीकर एका जाहीर सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मगोपचा राज्यातील कोळसा वाहतुकीला विरोध आहे.’’