विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार
मुंबई – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथे होणार आहे. ३ डिसेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय आला. कोरोनाच्या संसर्गामुळे अधिवेशन केवळ २ दिवस घेण्यात येत आहे. यापूर्वी विधीमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले होते; मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे अधिवेशनाच्या दिनांकात पालट करण्यात आला. यापूर्वी झालेले विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही केवळ २ दिवसांचे घेण्यात आले होते. अधिवेशन केवळ २ दिवस घेण्यात येत असल्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘केवळ २ दिवस अधिवेशन घेणे योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.