वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !
मुंबई – राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत. समाजातील सर्व जातींच्या नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे; मात्र ही नावे देण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे. सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव मांडला होता. (केवळ जातीवाचक नावे न पालटता परकीय आक्रमकांची शहरांना असलेली नावेही शासनाने पालटावीत ! – संपादक)