अल्पवयीन हिंदु युवतीची छेड काढल्याच्या प्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३ डिसेंबर (वार्ता.) – येथील १७ वर्षीय हिंदु युवतीची छेड काढल्याप्रकरणी जय उपाख्य अलीयास याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (खोटे नाव धारण करून हिंदु युवतींची छेड काढणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक) ‘तुलसी विवाहासाठी दुचाकीवरून पेढे खरेदीसाठी जातांना जय उपाख्य अलीयास याने त्याची दुचाकी गाडी आडवी लावून ‘मला तुझ्याशी मैत्री करायची आहे’ असे बोलून भ्रमणभाष क्रमांक मागितला. नकार दिल्यावर बळजोरीने माझा हात पकडून ‘आईस्क्रीम खाऊ’, असे सांगितले. मी आरडाओरडा केल्यावर हात सोडला. घरी जाईपर्यंत माझा पाठलाग केला, अशी तक्रार दिली आहे.