श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
‘१०.१.२०१७ या दिवशी झालेल्या श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. श्री बगलामुखी यज्ञाच्या पहिल्या दिवशी प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्या वेळी मला ‘स्वर्गलोकाचे द्वार उघडले गेले असून देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.
२. आनंद आणि चैतन्य यांनी भरलेला एक प्रकाशझोत यज्ञकुंडात प्रवेश करत होता. ‘देवता यज्ञकुंडाच्या वरती असलेल्या पत्र्यांच्या छताच्या जवळ उभ्या आहेत’, असेे मला जाणवत होते.
३. जवळच असलेल्या रस्त्यावरून एक गाय जात होती. ती थांबून यज्ञाला उपस्थित असलेल्या साधकांकडे निरखून पहात होती. ‘ती जणू कान टवकारून यज्ञातील मंत्रोच्चार लक्षपूर्वक ऐकत आहे’, असे वाटत होते. मला तिचे तोंड चैतन्यमय वाटत होते.’
– सौ. योगिता चेऊलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |