घरी बनवलेले केश तेल वापरल्याने झालेले त्रास आणि सनातन केश तेल वापरल्याने झालेले लाभ !
१. घरी बनवलेले केश तेल वापरल्यावर ‘मानसिक त्रास वाढत आहे’, असे जाणवणे आणि ‘मनाचा गोंधळ होणे, न सुचणे’, असे त्रास होणे
‘घरी गेल्यावर मी घरचे खोबरेल तेल, कढीपत्ता आणि जास्वंदीची फुले (त्यांत निर्माल्य आणि झाडावरची लाल जास्वंदीची काही फुले होती.) या तीन घटकांचे मिश्रण करून तेल बनवले होते. ते तेल मी नियमित वापरत होते; परंतु ‘ते केसांना लावल्यावर माझा मानसिक त्रास वाढत आहे आणि डोके जड होत आहे’, असे मला जाणवत होते, तसेच ते तेल लावल्यावर माझ्या डोळ्यांत आणि तोंडवळ्यात पालट जाणवल्यामुळे ‘मला त्रास होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘माझे मन आणि बुद्धी यांवरही नकारात्मक परिणाम होत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवत होता. माझ्या मनातील विचारांचे प्रमाणही वाढले होते. बुद्धीवरील त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे ‘मनाचा गोंधळ होणे, न सुचणे’, अशी मनाची स्थिती होती.
हे तेल मी बनवले होते आणि मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तसेच वातावरणातील त्रासदायक स्पंदने घनीभूत झाली असावीत. त्यामुळे ‘त्या तेलात नकारात्मक स्पंदने असावीत आणि ते तेल त्रासदायक शक्तीने भारित झाले असावे’, असे वाटते.
२. ‘सनातन केश तेल’ वापरल्यावर मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होणे अन् आध्यात्मिक त्रासात घट झाल्यामुळे सकारात्मकतेत वाढ होणे
मी ‘सनातन केश तेल’ वापरल्यावर माझ्या भोवतालच्या त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले. माझ्या डोक्याला शीतलता जाणवत होती. माझे मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन मला चैतन्य मिळत होते. त्यामुळे मनातील विचारांचे प्रमाण न्यून होऊन मला दैनंदिन कृती करणे सुचू लागले. माझ्या आध्यात्मिक त्रासात घट झाल्यामुळे सकारात्मकतेत वाढ झाल्याचे लक्षात आले.
३. सनातनची सात्त्विक उत्पादने वापरल्याने होणारे लाभ
‘सनातनची सात्त्विक उत्पादने साधकांनी सेवाभावाने आणि नामजप करत बनवली आहेत. त्यामुळे त्यांतून चैतन्य मिळून ईश्वरी लाभ होतो. ही उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरली, तर व्यावहारिक लाभ होतो आणि साधना करण्यास साहाय्य मिळते. या उत्पादनांचा वापर केल्यावर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही लाभ होतो. ‘हे सर्व आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे’, असे लक्षात येते. ‘ही उत्पादने वापरण्यास मिळणे’, ही एक प्रकारे ईश्वरी कृपाच आहे.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२०)
|