श्री बगलामुखी यागाच्या स्थळी संतांचे आगमन होण्यापूर्वी आणि नंतर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत श्री बगलामुखी याग करण्यात आला. यागाच्या दुसर्या दिवशी (९.१०.२०१६ ला) मला पुढील सूत्रे लक्षात आली.
१. संत यज्ञस्थळी येण्यापूर्वी यज्ञकुंडातून धूर येत नव्हता.
२. यज्ञस्थळी स्थापन केलेल्या देवतांना संतांनी नमस्कार करतांना आणि यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालतांना यज्ञकुंडातून येणारा धूर त्यांच्या विरुद्ध दिशेला जाणे
संत यज्ञस्थळी आल्यानंतर यज्ञकुंडातून धूर येऊ लागला. त्यांनी यज्ञस्थळी स्थापिलेल्या सर्व देवतांना नमस्कार केला. त्या वेळी आणि नंतर ते यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालत असतांना यज्ञकुंडातील धूर त्यांच्या विरुद्ध दिशेला जात होता. त्या वेळी ‘धुरामुळे संतांना त्रास होणार नाही, याची काळजी देवता घेत आहेत’, असे जाणवत होते.
३. संतांची यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालून पूर्ण झाल्यावर यज्ञकुंडातील धुराने त्यांना स्पर्श करणे आणि परत विरुद्ध दिशेने जाणे
संतांची यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालून पूर्ण झाल्यावर यज्ञकुंडातील धूर थोडासा त्यांच्या दिशेने जाऊ लागला. त्या धुराने त्यांच्या जवळ येऊन त्यांना स्पर्श केला आणि पुन्हा विरुद्ध दिशेला गेला. त्या वेळी ‘त्यांना स्पर्श करण्यासाठीच तो त्यांच्या जवळ गेला होता’, असे वाटले.
४. यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलीत झाल्यावर अग्निदेवच प्रकट झाल्याचे जाणवणे
संत यज्ञस्थळापासून थोडे दूर गेल्यानंतर यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित होऊन त्याच्या ज्वाळा पुष्कळ उंच जाऊ लागल्या. त्या वेळी ‘जणू अग्निदेवच प्रकट झाला आहे,’ असे वाटले.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०१६)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |