आसाम सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करत आहे ! – अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा
|
गौहत्ती (आसाम) – आसाममध्येही लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात येत आहे. या अंतर्गत विवाहापूर्वी १ मास विवाह करणार्या जोडप्यांना कागदपत्रांसह स्वतःचा धर्म आणि उत्पन्न यांविषयी माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले की, महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा केला जाणार आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत बनवण्यात आलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे हा कायदा नसेल; मात्र काही समानता असणार आहे. हा सर्व धर्मांसाठी समावेशी असा कायदा असणार आहे.
Love Jihad: ‘Men Must Declare Their Religion, Job And Income Before Marrying,’ Says Assam Minister Himanta Biswas
Read More About It: https://t.co/Dkz3FBrg5g pic.twitter.com/HtYL2KsJKF
— ABP News (@ABPNews) December 1, 2020