ब्रिटनमध्ये जाऊन कोरोना लस घेण्यासाठी भारतियांची ट्रॅव्हल एजंट्सकडे चौकशी
नवी देहली – कोरोनाची लस भारतात मिळण्यासाठी अद्याप काही मास लागणार आहेत; मात्र ब्रिटन आणि रशिया यांनी लसीकरणाला मान्यता दिली असून ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लोकांना लस देण्यात येणार आहे. ही लस टोचून घेण्यासाठी भारतियांना ब्रिटनमध्ये जायचे आहे. त्यामुळे भारतीय नागरिक ब्रिटनला जाण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सकडे याविषयी विचारणा करत आहेत. एक ट्रॅव्हल एजंट यासाठी भारतियांसाठी विशेष ३ नाईट पॅकेजची आखणी करत आहे. ‘वयोवृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना लशीचा पहिला डोस मिळणार आहे’, असे या एजंटने त्याच्याकडे विचारणा करणार्यांना सांगितले.