सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अभियान राबवतांना विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आगामी निवडणुकांत सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकावण्यासाठी प्रामाणिक काम केले पाहिजे. यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणीवर भर द्या, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी शिवसैनिकांना केले.
कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.