पडवणे डोंगरावर भीषण आग
देवगड – तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आग ३ दिवसांपूर्वी लागली असून १ डिसेंबरच्या रात्री या आगीने भीषण रूप धारण केले. २ डिसेंबरला ही आग संपूर्ण डोंगरावर पसरली. या आगीने एवढे भीषण स्वरूप धारण केले आहे की, देवगड शहरातूनही धुराचे लोळ दिसत होते.