सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्लोक
साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. अशोक पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही (प.पू. डॉक्टरांचे) असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.
अनुभूतीचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426466.html
अनुभूतीचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426740.html
अनुभूतीचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427105.html
अनुभूतीचा भाग ४ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427396.html
श्लोक
नमः क्षात्रतेजसे, हिन्दुराष्ट्रराजाय, नमो राष्ट्रधमार्य नमो हिन्दुराष्ट्रहितकराय, नमः सनातनधर्माय ।
नमो महर्षि-अध्यात्मविश्वविद्यालय-संस्थापकाय श्रीविष्णुरूपं श्रीश्रीजयन्तं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ५ ॥
अर्थ : क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.
‘देवा, तू जे सुचवलेस, ते मी लिहिले आणि तुला अर्पण केले. काही राहिले असेल, तर क्षमा करावी.
(समाप्त)
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’
गुरुचरणी शरणागत,
– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१६)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |