बारामती तालुक्यात सव्वा मासाच्या बालिकेला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना
बारामती – येथील सव्वा मासाच्या बाळाच्या मृत्यूच्या प्रकरणी बाळाची आई दीपाली संजय झगडे हिच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदननगर भागात ही घटना घडली. दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगी झाल्याने दीपाली निराशेमध्ये होती. आपले बाळ कुणीतरी पाण्याच्या टाकीत बुडवून मारले असा कांगावा तिने केला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यावर आपणच हे कृत्य केल्याची तिने कबुली दिली. आपल्याला मुलगा हवा या हव्यासापोटी आपल्या तिसर्या मुलीचा बळी दिल्याची गोष्ट उघडकीला आली. (सदोष मनुष्यवधासारखी घटना हातून घडणे असे कृत्य केवळ धर्मशिक्षणाच्या अभावानेच घडू शकते. – संपादक)