श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन
कल्याण, २ डिसेंबर (वार्ता.) – आजच्या आधुनिक युगात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना यांविषयी मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा घेण्यात आली.
सर्वच किल्ले पुष्कळ चांगले सिद्ध करण्यात आले होते. सर्व स्पर्धकांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. तसेच कार्याची माहिती देऊन रायगडावर होणार्या महाराजांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाची माहिती देऊन कर्तव्यनिधीसाठीही त्यांना आवाहन करण्यात आले.