पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत संतप्त प्रवाशांचे रेल्वे बंद आंदोलन
ठाणे, २ डिसेंबर (वार्ता.) – पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत २ डिसेंबर या दिवशी सकाळी संतप्त प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन केले. डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रहित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन पुकारले. या वेळी प्रवाशांनी मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस रोखून धरली होती. ‘पालघर रेल्वे स्थानक मास्तरांनी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन मध्य मुंबई येथे (मुंबई सेंट्रल) पाठवण्यात येईल आणि प्रवाशांच्या मागण्यांवर विचार करण्यात येईल’, असे आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.