गोव्यात जून २०२१ पासून नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) गोवा राज्यात जून २०२१ पासून नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिखाजन, मये येथे एका शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या वेळी दिली. ते म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यविकासावर भर दिला जाणार असून अशा प्रकारचे उपक्रम चालू करण्यास गोव्यातील शैक्षणिक संस्थांना गोवा शासन सर्वप्रकारे साहाय्य करील.’’