छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटात २ जण घायाळ
बिजापूर (छत्तीसगड) – येथे नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.