सिंधुदुर्गातील सर्व न्यायालयांचे कामकाज आजपासून पूर्ववत् चालू होणार
सिंधुदुर्ग- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांनुसार आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज चालू होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय आणि तालुका न्यायालये १ डिसेंबरपासून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत् चालू करण्यात येणार आहेत. या वेळी प्रत्यक्ष न्यायिक कामकाज सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार असून कार्यालयीन कामकाज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत चालणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ओरोसचे सचिव दीपक मालटकर यांनी दिली.