मनीषाताई जाणीव करून देतसे आम्हाला ध्येयाची ।

सौ. प्रतिभा फलफले यांनी त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या पुणे जिल्ह्यातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मनीषा पाठक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत केलेली कविता पुढे दिली आहे. 

सौ. मनीषा पाठक

मनीषाताई, तू आई आम्हा लेकरांची (टीप १) ।
जाणीव करून देतसे तू आम्हाला ध्येयाची ॥ १ ॥

‘आम्ही साधनेत पुढे जावे’, ही तळमळ असे तुला ।
शिकवशी आम्हा कृतीला भावाची जोड द्यायला ॥ २ ॥

अखंड प्रयत्न असती तुझे आम्ही घडावे यासाठी ।
आम्हाला देशी तू साधनेचे धडे पुढे जाण्यासाठी ॥ ३ ॥

प्रतिनिधी असशी तू गुरुदेवांची ।
क्षणोक्षणी प्रीती देशी तू माऊलीची ॥ ४ ॥

आमच्या मनाची स्थिती ठाऊक असे तुला ।
जसे माऊलीच जाणते लेकरांच्या अंतर्मनाला ॥ ५ ॥

तुझ्यासारखे गुण आत्मसात करता येऊ देत आम्हाला ।
तुझ्यासारखे भावमय होता येऊ दे आम्हाला ॥ ६ ॥

आमच्यामध्ये तळमळ निर्माण होऊ दे पालटण्याची ।
हीच प्रार्थना आहे गुरुचरणांसी आमची ॥ ७ ॥

टीप : लेकरांची – जिल्ह्यातील साधकांची

– सौ. प्रतिभा फलफले, पुणे (४.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक