अवैध पशूवधगृह चालकांवर तात्काळ कारवाई करण्याविषयी पाळधी (जळगाव) येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
जळगाव, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – पाळधी येथील अवैध पशूवधगृह पुन्हा चालू झाल्याविषयी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या घटनेचा निषेध केला असून तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. १६ सप्टेंबर या दिवशी या अवैध पशूवधगृहातून २० हून अधिक गोवंश कह्यात घेण्यात आले होते; परंतु पुन्हा तेच पशूवधगृह त्याच ठिकाणी चालू करण्यात आले आहे. आरोपींची हिम्मत वाढली असून कुठली ठोस कारवाई का होत नाही ? असा प्रश्न पाळधी ग्रामस्थांना आहे. अवैध पशूवधगृहांतून गोमांस निर्यात होत असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदू संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून अशा अवैध पशूवधगृह चालकांवर तात्काळ कारवाई करण्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलीस प्रशासन मात्र या प्रकरणी उदासीन दिसत आहे.