गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू होण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळली आहे. ते म्हणाले, ‘‘गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता नाही. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी न करणे इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून गोव्यातील लोक कोरोनाचा पराभव करू शकतात.’’
२८ नोव्हेंबरला ते देहली येथून गोव्यात परत आले.