पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यावर संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी घोषणा देणारे ३ तरुण पोलिसांच्या कह्यात
पुणे – कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या. त्याच वेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी घोषणा देणार्या ३ तरुणांना कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.