बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान कुटुंबाकडून हिंदु तरुणीचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे २१ वर्षीय हिंदु मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या शेजारी रहाणार्या मुश्ताक कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात केली आहे. मुलीच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मुसलमान कुटुंबाला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हिंदु तरुणी मुसलमान तरुणाच्या प्रेमात होती.