मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
पणजी, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ नोव्हेंबरला देहली येथे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनमध्ये भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ५९ व्या गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितले ‘आज मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन गोव्याच्या ५९ व्या मुक्तीदिनानिमित्त उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही गोव्याचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी गोव्यातील खाणींविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देहली येथे गेले आहेत.