कोरोनाची चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दिल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य निलंबित
नवी मुंबई – चाचणी न करता अहवाल निगेटिव्ह दिल्याच्या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आधुनिक वैद्य सचिन नेमाडे यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दिल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती. ३ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवालही निगेटिव्ह दिल्याचा प्रकार झाला होता. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी चाचण्यांच्या माहितीची नोंद करण्याचे उत्तरदायित्व असलेले आधुनिक वैद्य सचिन नेमाणे यांना निलंबित केले आहे.