माझी प्रिय आई असे गुरुमाऊलीचे रूप जणू !
‘माझी आई आधुनिक वैद्य (सौ.) कस्तुरी भोसले हिचा ‘वैकुंठचतुर्दशीला’ म्हणजे, २९.११.२०२० या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवाच्या कृपेने सुचलेली कविता येथे देत आहे.
आधुनिक वैद्य (सौ.) कस्तुरी भोसले यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
आला एक जीव पृथ्वीवरी,
वैकुंठचतुर्दशीच्या शुभ तिथी ।
नावाप्रमाणे कस्तुरीचा सुगंध दरवळे सर्वत्र,
गंगेप्रमाणे तिचे मन आहे पवित्र ॥ १ ॥
देवाने दिली मजला आईरूपी अनमोल भेट,
प्रेमाने साधते ती सर्वांशी संवाद थेट ।
‘नम्रता’ असे तिचा स्थायीभाव,
तिच्यामध्ये आहे पुष्कळ भक्तीभाव ॥ २ ॥
श्रीगुरूंवर असे श्रद्धा अपार,
तिच्यातील सेवाभावाला नसे पारावार ।
तिचे अंतर्मन असे सद्गुणांची खाण,
हिंदु राष्ट्रासाठी घेतले तिने सतीचे वाण ॥ ३ ॥
‘माझी प्रिय आई’, असे गुरुमाऊलीचे रूप जणू,
प्रेमभाव आणि सेवाभाव यांचे मूर्तीमंत रूप जणू ।
सतत मिळे मला तिचा सहवासरूपी सत्संग,
तिचे बोलणे वाटे मज जणू अभंग ॥ ४ ॥
देवाने माझ्यावर कृपा केली,
मला गुरुमाऊली समान प्रेमळ आई दिली ।
भगवंताची कृपा ओसंडून वहाते,
कृतज्ञता व्यक्त करण्यास मी थिटेे पडते ॥ ५ ॥
– आईचे लेकरू,
कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |