लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींची भेट !
पुणे – येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर या दिवशी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. एका अधिकार्याच्या माहितीनुसार पंतप्रधान पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी ४.३० वाजता भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौर्यासाठी तयारी चालू झाल्याचे सांगितले होते.