रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी गरुडदेवतेने सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे काळे सर्प, सर्पास्त्र आणि काल सर्प यांना पळवून लावल्याचे जाणवणे
मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रामनाथी आश्रमात होणार्या गरुडयागाला बसण्याची संधी लाभली. तेव्हा यज्ञ चालू असतांना मला सूक्ष्मातून विराट रूपातील गरुडदेवतेचे दर्शन झाले. या वेळी गरुडदेवतेने आश्रमाभोवती प्रदक्षिणा घालण्यास आरंभ केला. ही प्रदक्षिणा घालतांना गरुडदेवतेने अनिष्ट शक्तींनी आश्रमावर आक्रमण करावे; म्हणून उपयोगात आणलेले काळे सर्प आणि सर्पास्त्र यांना पळवून लावले. प्रत्यक्षात प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या अस्तित्वामुळे काळे सर्प अन् सर्पास्त्र आश्रमावर आक्रमण करू शकत नव्हते; परंतु त्यांचे अस्तित्व आणि संहारक क्षमता कार्यरत होती. गरुडदेवतांच्या कृपेने ही अनिष्ट शक्तींची अस्त्रे निष्प्रभ झाली.
गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले. प.पू. गुरुमाऊलीच्या अपार कृपेमुळेच ही अनुभूती आली. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. बळवंत पाठक, दादर, मुंबई.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |