भगवंताचे प्रेम कसे ।
देवा, हे प्रेम कसे ।
तुझ्याविना राहू कसे ॥ १ ॥
तुझ्याविना माझे कोण नसे ।
तूच माझा सखा
आणि भगवंत असे ॥ २ ॥
तुझे प्रेम मन अनुभवत असे ।
तुझ्या दर्शनासाठी
मन आतुर असे ॥ ३ ॥
देवा हे प्रेम कसे ।
अखंड तुझ्यासाठी धडपडू कसे ॥ ४ ॥
तूच हवा असे मनी वाटे ।
तेव्हाच तो ईश्वर हृदयी वसे ।
असे या भगवंताचे प्रेम कसे ॥ ५ ॥
‘देवा, मला तुझे प्रेम अखंड अनुभवता येऊ दे. तुझ्यासाठी संघर्षावर मात करून केवळ तुला अपेक्षित असे लवकरात लवकर घडता येऊ दे आणि प.पू. गुरुमाऊलींचे मन जिंकता येऊ दे’, अशी आर्त प्रार्थना आहे.’
– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.८.२०१४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |