मंगळुरू येथे लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

असे देशविघातक लिखाण करणार्‍या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !

मंगळुरू (कर्नाटक) – वर्ष २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान या आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ मंगळुरू येथील एका निवासी इमारतीच्या भिंतीवर भडकावणारे लिखाण लिहिल्याचे समोर आले आहे. पोलीस हा मजकूर लिहिणार्‍यांचा शोध घेत आहेत.

१. ‘‘आम्हाला चिथावणी दिली, तर आमच्याकडून आंतरराष्ट्रीय आंतकवादी संघटना  आणल्या जातील’, अशी धमकी या लिखाणातून देण्यात आली आहे. यापुढे ‘आम्हाला लष्कर-ए-तोयबा आणि तालिबानी रा.स्व.संघ अन् मनुवादी यांच्याशी सामना करण्यास आतंकवाद्यास निमंत्रण देण्यास भाग पाडू नका. # लष्कर झिंदाबाद’, असे लिहिले आहे.

२. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन लिखाण खोडून टाकले. समाजांमधील वैर निर्माण करणे आणि मालमत्तेची हानी केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.