चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !
चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे
‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. या उलट मनुष्यप्राण्याची किमान सात्त्विकता २० टक्के असते. त्याच्या पाचही बोटांतून पंचतत्त्वांशी संबंधित शक्ती प्रवाहित होत असते. जेव्हा व्यक्ती हाताने जेवते, तेव्हा तिच्या हाताच्या पाचही बोटांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता तिच्या हातातील ग्रासाकडे (घासामध्ये) प्रवाहित होते आणि तिने अन्न ग्रहण केल्यावर ही सात्त्विकता पुन्हा तिच्या देहात जाते. अशा प्रकारे शक्तीपातयोगानुसार व्यक्तीकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि शक्ती तिला पुन्हा मिळते. या उलट चमच्याचा वापर केल्याने व्यक्तीच्या पाचही बोटांतून प्रवाहित होणारी शक्ती अंगठा आणि तर्जनी यांच्या माध्यमातून चमच्यामध्ये प्रविष्ट होऊन चमच्यातील रज-तम न्यून करण्यासाठी व्यय होते. त्यामुळे तिला स्वत:ची सात्त्विकता ग्रहण करता येत नाही. या उलट चमच्यातील रज-तमात्मक स्पंदने चमच्यातील अन्नकणांमध्ये जातात आणि तिला अन्नातून रज-तमात्मक शक्ती मिळते. त्यामुळे तिला चमच्याने खाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ न होता उलट तिची हानीच होते. त्यामुळे व्यक्तीने चमच्याने अन्न ग्रहण करण्यापेक्षा हाताने ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक योग्य आहे. असे जरी असले, तरी त्वचा रोग, हाताच्या बोटांना इजा झालेली असेल किंवा सूप, खीर यांसारखे पातळ पदार्थ ग्रहण करत असतांना व्यक्तीने हातापेक्षा चमच्याने अन्न ग्रहण करणे अधिक योग्य आहे. वरील अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’
चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे
टीप – ६१ टक्के पातळीनंतर बाह्य गोष्टींचा देहाच्या सात्त्विकतेवर अल्प प्रमाणात परिणाम झाल्याने ६१ टक्के पातळीनंतर चमच्याने अन्न ग्रहण करण्याचा परिणाम न्यून होऊ लागतो. ७१ ते ८० टक्के पातळीपर्यंत चमच्याने अन्न ग्रहण केल्याचा परिणाम केवळ १ टक्का इतकाच होतो आणि ८१ टक्के पातळीनंतर हा परिणाम ० टक्के इतका म्हणजे अजिबात होत नाही.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात. |