भगवंताने १६ कलांचे भक्तीच्या कमलपुष्पात केलेले रूपांतर !
‘कमलपुष्पाच्या १६ पाकळ्या उमलल्या. भक्तीचा, प्रीतीचा अन् कृपेचा सौरभ दरवळला. पहा ना देवराणा, एकेक कमलदल उमलते.
१. देव हवाहवासा वाटला.
२. देव आमचा जाहला
३. आम्ही देवाचे जाहलो.
४. देवावर आमचे प्रेम जडले.
५. देवाने प्रेमाचे प्रीतीत रूपांतर केले.
६. देव भक्तावर प्रेम करू लागला. ती प्रेमकृपा होती.
७. देवाच्या असीम ज्ञानकृपेत भक्त न्हाऊन निघाला.
८. भक्ताच्या अथांग प्रीतीत देवाला वैकुंठाचा विसर पडला.
९. भक्ताच्या शांतीसागरात देव शेषशायी जाहला.
१०. भक्त शेष उरला देवाचे सहस्रमुखे गुणगान केले.
११. निर्गुण देवात सगुण भक्त सामावून गेला.
१२. सगुण भक्तात निर्गुण देव एकरूप झाला.
१३. देव-भक्त नाते संपुष्टात आले. (द्वैत संपले.)
१४. भक्त-देवाचे अद्वैत जाहले.
१५. भक्ताचा ‘परमहंस’ आकाशाच्या मानस सरोवरात विहार करू लागला.
१६. अहं, सोऽहं गेले अन् भक्त परमहंस पदाला गेला.
अशा या १६ कलांचे भगवंताने कमलपुष्पात रूपांतर केले आणि आपल्या करांत धारण केले.
तूच कर्ता आणि करविता ।
शरण शरण भगवंता ॥
तुझिया श्वासे पुष्प उमलले ।
तुझिया हर्षे सौरभ दरवळले ॥
– पुष्पांजली, बेळगाव (५.३.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |