ठाणे येथील मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांड प्रकरणी एक संशयित कह्यात

ठाणे, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – मनसेचे राबोडीतील प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येच्या प्रकरणात शाहीद शेख (वय ३५ वर्षे) या संशयिताला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


राबोडी येथील बिस्मिल्ला उपहारगृहाच्या समोर २४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमील हे दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.