इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !
खटल्यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती !
नगर – अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणी आरोग्य विभागाने हा खटला प्रविष्ट केला आहे.
Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार, 2 डिसेंबरला पुढील सुनावणी https://t.co/nmJV7bkKDn #Maharashatra #Ahmednagar #IndoriakarMaharaj #इंदुरीकरमहाराज #इंदोरीकरमहाराज
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
या खटल्यातील इंदुरीकर महाराजांचे अधिवक्ता के.डी. धुमाळ यांच्याकडे सरकारी अधिवक्ता बी.जे. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रकरण प्रविष्ट आहे. त्यामुळे या संबंधांचा इंदुरीकर महाराजांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप झाल्याने अधिवक्ता कोल्हे यांनी इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातील सरकारी वकीलपत्र मागे घेतले आहे. त्यामुळे या खटल्यासाठी सरकारी पक्षाने अधिवक्ता रवींद्र राठोड यांची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालय अधीक्षकांनी दिली.