पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण
‘तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असते किंवा शक्तीपीठ असते; परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे.’ पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग (मिलाप) आहे.’
– श्री. मुकुंद भगवान पुजारी, पंढरपूर (श्री विठ्ठलाच्या ७ सेवेकर्यांपैकी श्री विठ्ठलाची पूजा करणारे एक सेवेकरी)