पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका
नवी देहली – पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर भारताने म्हटले, ‘‘पाकने खोटी आणि काल्पनिक कथा सांगणे आता नवीन राहिलेले नाही. पाक संयुक्त राष्ट्राकडून घोषित करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो. पाकच्या एबटाबादमध्ये पाकने अशाच एका आतंकवाद्याला आश्रय दिला होता.’’ येथे पाकने ओसामा बिन लादेन याला आश्रय दिला होता आणि अमेरिकेच्या सैनिकांनी त्याला ठार केले होते.
The “dossier of lies” presented by Pakistan enjoys zero credibility.
Concocting documents and peddling false narratives is not new to Pakistan, host to worlds largest number of UN proscribed terrorists and entities.
Remember Abbottabad!@MEAIndia @DrSJaishankar @PMOIndia
— PR UN Tirumurti (@ambtstirumurti) November 24, 2020
‘Remember Abbottabad!’ India slams Pak for presenting ‘dossier of lies’ at UN https://t.co/WgkrNgL0rP
— TOI World News (@TOIWorld) November 25, 2020
भारताने काश्मीरमध्ये ४ आतंकवाद्यांना ठार केल्याच्या घटनेविषयी सादर केलेल्या अहवालानंतर पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा हा अहवाल सादर केला आहे.