‘गूगल पे’द्वारे पैशांचे हस्तांतरण होणार बंद

नवीन प्रणालीच्या माध्यमांतून सशुल्क हस्तांतरण करता येणार

नवी देहली – जानेवारी २०२१ पासून ‘गूगल पे’ या अ‍ॅपवरून ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ (एका खात्यातून दुसर्‍या खात्यात) ही पैसे हस्तांतर करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

त्याऐवजी गूगलकडून ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम’ आणण्यात येणार असून त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे; मात्र, ही सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्याला किती शुल्क आकारला जाईल, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.