रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार आणि त्यांच्याविषयीचा भाव
‘रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अंतरंगी भक्त आहेत. संत तुकाराम महाराज यांनी सूक्ष्मातून दिलेल्या ज्ञानाद्वारे भस्मे महाराजांनी ६ वर्षांत ‘तुकाराम चैतन्य’ नावाचा कन्नड भाषेतील ग्रंथ लिहिला. भस्मे महाराज रामनामाचा अखंड जप करतात. त्यांनी आपल्या शिष्यवृंदाच्या समवेत आतापर्यंत २ सहस्र कोटी रामनामाचा जप केला आहे.
१. श्री. भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
परात्पर गुरु डॉ. आठवले स्वयं श्रीरामच आहेत आणि तेच सर्व समस्यांचे निराकरण करू शकतात. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
२. श्री. भस्मे महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव
एकदा भस्मे महाराज त्यांच्या परिचयातील उडुपी येथील साधक श्री. सोमनाथ मल्ल्या यांना ‘सोमनाथानंद’ असे म्हणू लागले. तेव्हा श्री. सोमनाथ यांनी भस्मे महाराज यांना विचारले, ‘‘माझे नाव अशा पद्धतीने उच्चारण्याचे कारण काय ?’’ तेव्हा भस्मे महाराज म्हणाले, ‘‘तुमच्या हृदयात आनंदस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचा वास आहे; म्हणून मी तुम्हाला ‘सोमनाथानंद’ म्हणतो.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |