चातुर्मासात एकादशीच्या निमित्ताने काही शब्दांचे अर्थ
१ जुलै या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवसापासून चालू झालेल्या चातुर्मासाच्या निमित्ताने प्रत्येक एकादशीला प्रतिदिनच्या वापरातील नेहमीचेच शब्द; परंतु त्या शब्दांचे विशेष आणि नवीन अर्थ उद्धृत करून ते आपणा सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न चालू केला आहे.
या चातुर्मासाच्या अंतर्गत आज, २५ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या प्रबोधिनी एकदशीनिमित्त ‘पूजा’ या शब्दाचा अर्थ पाहूया. हा या मालिकेतील अंतिम ११ वा शब्द आहे.
पूर्वजन्मानुशमनाज्जन्मृत्युनिवारणात् ।
सम्पूर्णफलदानाच्चपूजेतिकथिताप्र्रिये ॥
अर्थ : भगवान श्री शिवशंकर सांगतात, ‘‘हे प्रिय पार्वती, ज्यामुळे पूर्वजन्माचे अनुशमन होते, तसेच जन्म-मृत्यूच्या चक्राचे देखील निवारण होते आणि आपल्या केलेल्या कर्माचे संपूर्ण फळ मिळते, त्याला ‘पूजा’ असे म्हणतात.’’
– वेदमूर्ती कौशल दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.