प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण
‘१७.८.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात भ्रमणभाषद्वारे झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण पुढे दिले आहे.
१. प.पू. दास महाराज आणि भस्मे महाराज यांनी एकमेकांकडे आशीर्वाद मागणे
प.पू. दास महाराज : आपण प्रभु श्रीराम आणि संत तुकाराम महाराज यांचे भक्त आहात. मला आशीर्वाद द्या.
भस्मे महाराज : मी आपल्यापेक्षा लहान आहे. आपणच मला आशीर्वाद द्या.
२. प.पू. दास महाराज आणि भस्मे महाराज यांना आलेल्या एकसारख्या अनुभूती
प.पू. दास महाराज : आपण आपल्या शिष्यवृंदाच्या समवेत श्रीरामाचा २ सहस्र कोटी नामजप पूर्ण केला आहे. त्यानंतर आपल्याला काय अनुभूती आली ?
भस्मे महाराज : मी पूर्वी लहानशा कुटीत रहात होतो. तेथेच आपल्या शिष्यांच्या समवेत श्रीरामाचा २ सहस्र कोटी नामजप पूर्ण केला. जप पूर्ण झाल्यावर शंकरशेट्टी नावाच्या भक्ताने मला त्या जागी नवीन वास्तू बांधून दिली.
प.पू. दास महाराज : मलाही अशीच अनुभूती आली. मी पूर्वी बांदा (पानवळ) येथे एका लहानशा कुटीत रहात होतो. तेथेच साधना करत होतो. नंतर एका संतांनी त्या जागेत श्रीरामाचे सुंदर मंदिर बांधले. आपल्याला मी गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण देतो.
भस्मे महाराज : परात्पर गुरु डॉ. आठवले स्वयं श्रीरामच आहेत. आम्ही पुष्कळ भाग्यवान आहोत की, अशा पावन भूमीत आम्हाला पाय ठेवायला मिळणार आहे.
३. प.पू. दास महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्रितपणे कार्य करण्याविषयी मांडलेला विचार भस्मे महाराज यांनी स्वीकारणे
प.पू. दास महाराज : परात्पर गुरु डॉक्टरांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प आहे. तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत. भारताचे पाकिस्तान व्हायला नको.
भस्मे महाराज : माझे भक्त या कार्यासाठी जोडले जातील. आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्रित कार्य करू.
४. भस्मे महाराज यांना प.पू. दास महाराज यांच्या पाठीमागे हनुमानाचे दर्शन होणे
भस्मे महाराज : हिंदु राष्ट्र येणारच आहे. हे कार्य करण्यासाठी प्रभु श्रीरामाने, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनी मला शक्ती द्यावी. आपणही मला शक्ती द्यावी.
प.पू. दास महाराज : आपण मला शक्ती द्यावी !
भस्मे महाराज : आपण बोलत असतांना मला आपल्यामागे हनुमानाचे दर्शन झाले. जेथे प्रभु श्रीराम, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आहेत, तेथे आपण, म्हणजे हनुमान असणारच आहे.
५. भस्मे महाराज यांचा प.पू. दास महाराज यांच्याप्रतीचा भाव
‘भस्मे महाराज आणि प.पू. दास महाराज यांच्यात रात्री १० वाजता संभाषण झाले. त्यानंतर भस्मे महाराज एका साधकाला म्हणाले, ‘‘मी एरव्ही लवकर भोजन करतो. ‘प.पू. दास महाराज यांच्या सत्संगातून मला रसामृत मिळावे आणि त्यात काही अडचण येऊ नये’, यांसाठी प.पू. दास महाराज यांच्याशी बोलल्यानंतर मी भोजन करण्याचे ठरवले.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |