देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे
‘व्हेरीकोज व्हेन्स’च्या त्रासामुळे पायात असह्य वेदना होणे आणि देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे
‘मला ‘व्हेरीकोज व्हेन्स’चा (varicose veins चा) त्रास आहे. त्यामुळे दिवसभर माझ्या पायांत पुष्कळ वेदना होत असतात. जेव्हा पायांतून कळा येतात आणि वेदना असह्य होतात, तेव्हा मी कळवळून प्रार्थना करतो, ‘गुरुदेवा मला तुमच्याविना कुणीही दिसत नाही’; कारण माझ्याकडे ‘परात्पर गुरु डॉक्टरांना आळवणे’ हाच पर्याय असतो.
याविषयी देवाला विचारले असता देवाने मला सांगितले, ‘तुला प्रारब्धानुसार त्रास आणि वेदना होणारच आहेत. तुला होणारी प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेव.’ मला वेदना होत असतांना त्याच्या कृपेमुळेच गुरुदेवांची आठवण होते आणि वर सांगितल्याप्रमाणे भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळतो. ‘कृपाळू गुरुमाऊलीने प्रत्येक क्षणी तिचे स्मरण करण्याची संधी दिली’, यासाठी तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अपूर्व प्र. ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |