प्रौढ व्यक्तीला आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

  • धर्मांतर करून केलेल्या विवाहाला ठरवले वैध !

  •  हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांनी पळून जाऊन केलेल्या विवाहावर केली सुनावणी

आता शासनानेच ‘लव्ह जिहाद’वर आळा घालण्यासाठी कठोर कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

प्रयागराज – येथील सलामत अंसारी नावाचा मुसलमान मुलगा आणि प्रियांका खरवार नावाच्या हिंदु मुलगी यांनी पळून जाऊन विवाह केल्याची घटना नुकतीच घडली. विवाहानंतर प्रियांकाने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला. प्रियांका उपाख्य आलियाच्या वडिलांनी या विरोधात पोलिसांत तक्रार केली.

या प्रकरणात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मुला-मुलींना आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. कायदा प्रौढ व्यक्तींना एकत्र रहाण्याचा अधिकार देतो. न्यायालय या प्रकरणाकडे हिंदु-मुसलमान या दृष्टीने पहात नाही.

धर्मांतर करून केलेला विवाह हा अवैध असल्याच्या प्रियांका खरवारच्या वडिलांनी घेतलेल्या आक्षेपालाही न्यायालयाने चुकीचे ठरवत प्रियांका आणि सलामत यांच्या विवाहाला वैध ठरवले.