सिंधुदुर्गात केवळ २ नवीन कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात केवळ २ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८५० आहे. जिल्ह्यात सध्या १७५ रुग्णांवर उपचार चालू आहेत.