केरळच्या चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह करण्यात आल्याने गदारोळ
|
अशा विवाहाला ‘प्रेम’ म्हणणारे निधर्मीवादी आता गप्प का ? ते चर्चचा विरोध का करत नाहीत कि ‘चर्चचा विरोध योग्य आहे; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ म्हणत त्याला विरोध केला, तर तो चुकीचा आहे’, असे त्यांना वाटते ?
कोची (केरळ) – येथील सायरो मलबार चर्चच्या येथील कदवंथरा सेंट जोसेफ चर्चमध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह झाला होता. या विवाहाचे छायाचित्र वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले होते. त्यावरून झालेल्या वादामुळे विवाह करून देणारे मार मैथ्यू वानीकिजक्केल आणि उपस्थित असणारे आणखी एक पाद्री यांना क्षमा मागावी लागल्याची घटना घडली आहे.
हा विवाह आंतरधर्मीय असल्याने त्याला विरोध करण्यात आला. सायरो मलबार चर्चच्या नियमानुसार अशा प्रकारचा विवाह होऊ शकत नाही. कार्डिनल मार जॉर्ज एलेनचेरी यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. एर्नाकुलम्-अंगमाली डायोसेकचे आर्चबिशप मार एंटोनी कारिलयांच्याकडून त्यांनी अहवाल मागवला आहे.
Kerala: Marriage between Christian woman and Muslim man upsets faithfuls, attending bishop says sorry https://t.co/q4E7sKCjqc
— OpIndia.com (@OpIndia_com) November 23, 2020
केरळमधील ‘लव्ह जिहाद’मागे इस्लामिक स्टेट ! – कॅथॉलिक पाद्रयांची संघटना
केरळमधील कॅथॉलिक पाद्रयांच्या संघटनेचे म्हणणे आहे की, अशा घटनेमागे ‘लव्ह जिहाद’ ही समस्या आहे. यामागे इस्लामिक स्टेटचा हात आहे. लव्ह जिहादद्वारे महिलांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात आहे. यावर गप्प रहाण्याची धमकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासारख्या जिहादी संघटनेने दिली आहे; कारण या संघटनेला वाटते की, सीएए कायद्याच्या विरोधातील त्यांच्या आंदोलनाला यामुळेच चाप बसू शकेल.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन गंभीर नाही ! – केरळ चर्च
केरळच्या चर्चचे म्हणणे होते की, काही मासांपूर्वी केरळमधील २१ जण इस्लामिक स्टेटमध्ये भरती झाले, त्यातील अर्धे धर्मांतरित ख्रिस्ती होते. केरळमधील ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन गंभीर नाही.