रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार

मॉस्को (रशिया) – अमेरिकी लोकांचा आत्मविश्‍वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्‍वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच किंवा कायदेशीर मार्गाने निकाल निश्‍चित झाला असेल तरच काम करू, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार दिला आहे.

‘बायडेन यांचे अभिनंदन न करण्याच्या निर्णयामागे एक औपचारिकता आहे. कोणताही गुप्त हेतू नाही. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध उद्ध्वस्त झाल्याची मला पूर्ण कल्पना आहे’, असेही पुतिन पुढे म्हणाले. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांचा विजय स्वीकारलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.