चीनमधून आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आता नोंदणी अनिवार्य ! – केंद्र सरकारचा आदेश

नवी देहली – चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्‍या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.

यात डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, वेबकॅम, ब्ल्यूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेट, एल्.ई.डी. डिमर यांचा समावेश आहे. या ७ उत्पादनांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच ही उत्पादने भारतात येतील. भारताने या उत्पादनांची सूची जागतिक व्यापार संघटनेला पाठवली आहे. ज्या उपकरणांचा दर्जा चांगला नसेल, त्यांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र मिळणार नाही. आतापर्यंत चिनी उपकरणांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक नव्हते.