कर्नाटक सरकार ऑनलाईन खेळांवर बंदी घालणार
ऑनलाईन खेळ हा जुगार असल्यामुळे बंदी घालणार
अशा प्रकारचा निर्णय केवळ कर्नाटक सरकारने घेण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने घेत संपूर्ण देशभरात ऑनलाईन खेळांवर बंदी घालून जनतेचे जुगारापासून रक्षण केले पाहिजे !
बेंगळुरू (कर्नाटक) – इंटरनेटवर ऑनलाईन खेळावर राज्यात लवकरच बंदी घालण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडुराव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बोम्मई म्हणाले की, अशा खेळांमुळे लोकांचे पैसे खर्च होतात. हा एक प्रकारचा जुगार आहे. यात लहान मुलांसह मोठेही सहभागी होत आहेत. याविषयी मुलांच्या पालकांनी आणि अन्य लोकांनी तक्रारी केल्यानंतर सरकार अशा प्रकारची बंदी घालण्याचा विचार करत आहोत.