फेसबूकवरील लिखाणावर लक्ष ठेवण्याच्या मंडळातील नोबेल पारितोषिक विजेती महिला ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या आतकंवादी संघटनेशी संबंधित
जिहादी आतंकवादी संघटनांच्या सदस्य असणारी लोक फेसबूकमध्ये असतील, तर ते हिंदू नेते, संघटना यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक पानांवर बंदी घालणारच, हे लक्षात घ्या ! फेसबूकने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीची यांची पाने यापूर्वीच का बंद केली आहेत, यामागील कारण आता लक्षात येते !
नवी देहली – फेसबूक या सामाजिक माध्यमांच्या ‘फेसबूक ओव्हरसाइट बोर्डा’तील एक सदस्य असणारी तवक्कुल करमन ही महिला ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती उघड झाली आहे.
Facebook Oversight Board, which controls content, has a Muslim Brotherhood figure: Detailshttps://t.co/mCFo3Asy4i
— OpIndia.com (@OpIndia_com) November 23, 2020
या संघटनेवर अनेक देशांमध्ये बंदी आहे. करमन हिला वर्ष २०११ मध्ये नोबेलचे शांतता पुरस्कारही मिळालेला आहे. करमन पूर्वी ‘येमेनी इस्लाह पार्टी’ची सदस्य होती. या पक्षाला ‘मुस्लिम ब्रदरहुड’चे समर्थन आहे.