‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा
१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (सप्टेंबर २०२०)
२. संकेतस्थळावरील लेख जगातील ८ भाषांमध्ये !
सप्टेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, इटालियन, व्हिएतनामी, चिनी, रशियन, इंडोनेशियन आणि स्पॅनिश या ८ भाषांमधील एकूण १९ लेख ठेवण्यात आले.
३. ‘ऑनलाईन’ प्रसार
अ. एस्.एस्.आर्.एफ्.चे ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ६ जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.
आ. ३० सहस्रांहून अधिक लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
४. ‘लॉग-इन’ सुविधा
४ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश आणि इंडोनेशियन या ६ भाषांतील वाचकांच्या ६० प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी नामजप आणि आध्यात्मिक उपाय चालू केले आहेत.
४ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये एकूण ६६ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी नामजपादी उपाय चालू केले.
या दोन्ही सुविधांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये एकूण १२६ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
५. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, सर्बो-क्रोएशियन, फ्रेंच आणि रशियन या ७ भाषांतील १ सहस्र ५८० वाचकांशी संवाद साधता आला.
६. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
सप्टेंबर २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन, क्रोएशियन अन् इंग्रजी या भाषांत; जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड येथे जर्मन भाषेत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, रशिया, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाइन’ ३९ व्याख्याने अन् १० कार्यशाळा घेण्यात आल्या. ३९ सहस्र २५० जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ६५ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
या व्यतिरिक्त जर्मन भाषेत २ ‘ऑफलाईन’ आणि बर्लिन येथे अर्ध्या दिवसाची एक कार्यशाळा घेण्यात आली.
७. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या
८. एकूण १९२ देशांत ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणारे वाचक आहेत.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑक्टोबर २०२०)